ACB action against Assistant Police Inspector : रेतीच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी लाच मागणारे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एसीबीचे कार्यवाही
नांदेड| रेतीच्या वाहनावर पोलिसांनी कोणतेही कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या भागवत तुकाराम नागरगोजे, वय -44 वर्षे, पद - सहाय्यक पोलीस निरीक्षक, वर्ग -2, नेमणुक - कुंडलवाडी पोलीस स्टेशन, ता. बिलोली जि. नांदेड रा. होनिहीप्परगा ता. उदगीर जि. लातूर, नारायण मारोतराव शिंदे, वय -36 वर्षे, पद - पोलीस उप निरीक्षक, वर्ग -2, नेमणूक - कुंडलवाडी पोलीस स्टेशन ता. बिलोली, जि. नांदेड रा. कोकर कॉलनी मानवत ता. मानवत जि. परभणी यांनी 25,000/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 17,000/- रूपये लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक (ACB action against Assistant Police Inspector) विभागाने कार्यवाही केली आहे.
तक्रारदार यांचेकडे एक हायवा वाहन असून, ते या वाहनाने कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यावरून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात. त्यांचा वाळू वाहतुकीचा हायवा पोलीस स्टेशन कुंडलवाडी ज...
