किनवट, परमेश्वर पेशवे। रिठा येथील माहिम्बा देवाच्या भव्य यात्रेस येत्या 30 जानेवारी पासून सुरुवात होत असून या यात्रेत कबड्डीचे खुले सामने रंगतदार होणार आहे. ईस्लापूर ,जलधारा परिसरातील प्रथम यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहिम्बा देवाच्या यात्रेस येत्या 30 जानेवारी गुरुवार पासून सुरुवात होत असून याच दिवशी सकाळी दहा वाजता देवस्थानचे मानकरी दत्ता हराळे वाडीकर व इतर मान्यवराच्या उपस्थित पूजा संपन्न होणार आहे.

तर तर कबड्डीचे उद्घाटन देखील 30 जानेवारी रोजीच होणार आहे.
या यात्रेत कबड्डीचे खुले सामने आयोजीत केले असून या सामन्याचे प्रथम बक्षीस 15001 रु. साईनाथ नागरगोजे व अमर केंद्रे यांच्या तर्फे देण्यात येणार आहे .द्वितीय बक्षीस 10001 रु भगवान हुरदुके माजी आढावा समिती अध्यक्ष यांच्या तर्फे, तृतीय बक्षीस 7001 रु काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आकाश जाधव यांच्या तर्फे तर चौथे बक्षीस 5001 रु. प्रशांत पुरसिंग राठोड पालाईगुडा, मुंबई यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. भिमराव केराम, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भगवान हुरदुके ,विशेष अतिथी म्हणून राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते कपिल नाईक, बालाजी आलेवार, दिनकर दहिफळे ,बालाजी मुरकुटे अजित साबळे ,साईनाथ नागरगोजे, अमर केंद्रे ,संतोष पेळे ,माधव डोकळे यांची उपस्थिती लाभणार आहे.

या यात्रेस येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दिवंगत आमदार कै. प्रदीप नाईक यांच्या स्मरणार्थ ईश्वर जाधव पत्रकार ईस्लापूर यांच्या तर्फे मिनरल वाटर पाण्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सदरील परिसरातील भाविक भक्तांनी या यात्रेचा व कबड्डीच्या खुले सामन्याचा खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच संदिप पानपते, उपसरपंच तथा उपाध्यक्षा गयाबाई बरगे, ग्रामसेवक तथा सचिव एस. एम .शिंदे, प्रबंधक म्हणून पोलीस पाटील अनिल कदम, मीराबाई जाधव गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश शेरु राठोड यासह रिठा येथील गावकऱ्यांनी केले आहे.
