Drainage Chamber : नांदेडच्या बिलालनगर भागातील नागरिकांवर आली ड्रेनेजचे तुंबलेले चेंबर साफ करण्याची वेळ

नांदेड| महापालिका प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराला जुन्या शहरातील सर्वसामान्य नागरिक कंटाळले असून, बिलालनगर येथील एका त्रस्त नागरिकाने आपल्या घरासमोरील रस्त्यावर ड्रेनेजचे तुंबून जाम झालेले चेंबर स्वतःच साफ केल्याचा प्रकार (It’s time for the citizens of Bilalnagar area of ​​Nanded to clean the clogged drainage chamber) आज समोर आला आहे. त्यामुळे मानपाचे ठेकेदार केवळ बिले उचलण्यासाठी आहेत का..? असा सवाल पुढे येऊ लागला आहे.

जुन्या नांदेड शहरातील बिलालनगर येथील एका रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर तुंबून जाम झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या या भागातील एका रहिवासी नागरिकाने महापालिका प्रशासनाकडे त्याविषयीची लेखी तक्रार केली. त्यानुसार मनपाचे त्या भागातील काही सफाई कामगार त्याठिकाणी आले आणि तुंबलेले ड्रेनेज साफ करण्याचे थातुर मातुर काम करून निघून देखील गेले.

त्यामुळे पुन्हा ड्रेनेज तुंबून दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट रस्त्यावर येऊ लागले आहे यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून परिणामी जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याला कंटाळलेल्या नागरिकावर स्वतःच ड्रेनेजचे चेंबर साफ करण्याची वेळ आली आहे. त्यावरून महापालिकेच्या प्रशासक राजमध्ये सद्द्या किती बेफिकीर कारभार सुरू आहे, आणि ठेकेदार केवळ धातूंमध्ये कमी करून बिले उचलण्यासाठीच नेमण्यात आले काय..? असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. अशा आरोग्याच्या प्रश्नावर गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणाऱ्या भावी आणि तत्कालीन नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button