Wednesday, May 13

Drainage Work Partial : ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे गाडेगाव रस्त्यावर अपघातांला निमंत्रण

नांदेड| शहरातील देगलूर नाका भागातून जाणाऱ्या गाडेगाव रस्त्यावरील मुजाहिद चौक ते आलू प्याज मार्केट पर्यंत ड्रेनेज लाईनचे काम (Gadegaon Drainage Work partial )गेल्या सहा महिन्यापासून अतिशय संथ गतीने चालू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अर्धवट असलेल्या या कामामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ये जां करताना त्रास होत आहे. परिणामी महापालिका प्रशासनाच्या अशा दुर्लक्षितपणाबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या ड्रेनेज लाईनला पॅचेस करण्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील देगलूर नाका भागातून गाडेगावकडे जाणारा हा रस्ता बोंडार हवेली, ब्राह्मणवाडा आणि पुढे मुदखेड मार्गावरील अनेक गावांना जोडणारा असल्याने या रस्त्यावरून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी अशा अनेक वाहनांची वाहतूक नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. अशा महत्वाच्या रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या कामाला मागील सहा महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. परंतु हे काम अद्यापही अतिशय संथ गतीने सुरूच असून त्याचे पॅचेस देखील करण्यात आले नाही. परिणामी या रस्त्यावरून ये – जा करताना वाहन चालकांसह पादचारी नागरिकांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे.

IMG 20250711 072622 Drainage Work Partial : ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे गाडेगाव रस्त्यावर अपघातांला निमंत्रण

शिवाय ड्रेनेज लाईनच्या या अर्धवट कामामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत चालले असल्याने त्यामधून एखाद्याचा बळी गेल्यानंतरच संबंधित प्रशासन जागे होणार आहे का ? असा संतप्त सवाल या भागातील स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत रेंगाळलेले हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!