HomeनांदेडNanded Sangharsh Samiti ; हिवताप व हत्तीरोग विभाग जिल्हा परिषद वर्गचे परिपत्रक...

Nanded Sangharsh Samiti ; हिवताप व हत्तीरोग विभाग जिल्हा परिषद वर्गचे परिपत्रक रद्द करण्याची नांदेड संघर्ष समितीचा तिव्र विरोध

नांदेड l मा.सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग) पुणे यांनी साडेपाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दि. 26 मार्च 2025 रोजी दि. 22 नोव्हेंबर 2019 चे परिपत्रक अंमलात आणण्यात यावे असे निर्देश संबंधित जिल्हा हिबताप अधिकारी, हत्तीरोग अधिकारी यांना दिले आहेत.

त्यात दैनंदिन प्रशासकीय कामकाज, लेखा, आस्थापना व तांत्रिक विषयक सर्व बाबी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांचे मान्यतेनुसार करावे असे नमूद केले आहे. सदर पत्रकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊन असंतोष वाढला असून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार आहे.

आज नांदेड जिल्हतील हिवताप, हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर निर्णयामुळे पगार,आस्थापना, पद्धतीने ,कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठतासूची च्या अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. अगोदरच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा व्याप असताना परत हिवताप, हत्तीरोग विभाग जिल्हा परिषद कडे हस्तांतर करणे कितपत योग्य आहे याचा सहानुभूती पूर्वक विचार होणे आवश्यक आहे. या विरोधात जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी तिव्र विरोध दर्शवला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments