HomeनांदेडRam Navami ; रामनवमीनिमित्त पतंजलीच्यावतीने ठिकठिकाणी योग शिबिरांसह विविध कार्यक्रम

Ram Navami ; रामनवमीनिमित्त पतंजलीच्यावतीने ठिकठिकाणी योग शिबिरांसह विविध कार्यक्रम

नांदेड l मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची जयंती दि.६ एप्रिल रोजी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने पतंजली योग समितीच्यावतीने ३, ५, ७ दिवसीय योग शिबिरे घेतली जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.

चैत्र महिन्याच्या शुक्लपक्ष नवमी तिथी ला प्रभु श्रीरामजीचा जन्मोत्सव साजरी केल्या जातो. यावर्षी दि. ६ एप्रिल रोजी प्रभु श्रीराम जन्मोत्सव म्हणजे अंधारातून – प्रकाशाकडे, असत्याकडून – सत्याकडे, वाईटातून – चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. मर्यादा पुरुषोत्तम अशी श्रीरामांची ओळख असल्याने त्यांच्या ठायी असलेली करुणा, दया, सत्य, सदाचार, सहनशीलता, धैर्य आदि गुण आपल्या अंगी बाणविण्याच्या उद्देशाने पतंजली योग समितीच्यावतीने जिल्हाभरात ३, ५, ७ दिवसीय योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य कार्यक्रम चंदगीराम अ‍ॅन्ड सन्स, रजिस्ट्री ऑफिस शेजारी, स्टेडियम रोड, नांदेड येथे सकाळी ५.३० ते ७.०० घेण्यात येणार आहे. विशेषत: मुलांसाठी लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण या निमित्ताने दिले जाणार आहे. या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन पतंजली योग परिवार यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments