Biloli News ; बिलोली तालुक्यातील गंजगावात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला ;घातपात झाल्याची शक्यता

बिलोली, गोविंद मुंडकर। तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या गंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस गावातीलच एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. सदर तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

याबाबत अधिक माहिती अशी की,दि.२७ मे रोजी सकाळी बिलोली तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या गंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस गावातीलच मारोती गंगाराम वन्नलवार (वय ३५ )यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती गंजगावातील ग्रामस्थांनी दिली.

गावातीलच तरूणाचा मृतदेह आढळल्याची माहिती वा-यासारखी पसरताच बिलोली पोलिसांना सदर घटनेची खबर मिळाल्यावरून घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. असल्याचे पोलीस पाटील श्री रामराव पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.सदर तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. गौतम आणि मल्लिकार्जुन या दोन संशयित व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

अवैध शिंदी आणि दारू विक्री: वाढली गुन्हेगारी – विशेष म्हणजे तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या गंजगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने देशी विदेशी दारूची खुल्या पद्धतीने विक्री होते.गावातच दारू मिळत असल्याने तरूण वर्ग व्यसनाच्या विळख्यात सापडला. सदर घटना ही दारूच्या नशेत घडली असू शकते असा संशय गावातील काही नागरिकांनी व्यक्त करत आहेत. अवैध दारू आणि शिंदी याबाबत गावातील हनुमंत कानशेट्टे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button