नांदेड| नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिका शहराचा पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करून प्राधिकरण करण्याकरिता बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नामदार हेमंत पाटील यांनी केली . यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आमदार आनंदराव बोंढारकर यांची उपस्थिती होती.


मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर नंतर महत्वाचे शहर म्हणून नांदेड ओळखले जाते सध्या शहराची लोकसंख्या १० लक्ष झाली असल्यामुळे महानगरपालिकेची हद्द वाढविणे गरजेचे आहे. शहराच्या आजूबाजूस २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग होत असून त्याठिकाणी कोठेही नगरविकास खात्याच्या नियमाप्रमाणे रस्ते सोडलेले नाहीत. पार्किंग करिता मोकळ्या जागा नाहीत, खेळाचे मैदान व बगीचे याकरिता नियमानुसार जागा राखीव ठेवलेल्या नाहीत.

त्यामुळे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात एक मोठे खेडे तयार झाल्यासारखे वातावरण होत आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी अनिर्बंध बाधंकामे होत असून त्यामुळे नांदेड शहर हे विद्रुप झालेले आहे. पूर्वीपासून नांदेड शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. त्यास या बाबींमुळे गालबोट लागत आहे. करण्यात आली. यापूर्वी सुद्धा नांदेडच्या शिष्टमंडळाने नामदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली होती. त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत मा. एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ बैठक आयोजित करण्याचा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या आज पुन्हा या संदर्भात भेट घेतली.व पुढील २५ वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी केली .
