नांदेड l श्री भगवान बालाजीं मंदिर सिडकोचा 35 वा वार्षिक ब्रम्होत्सवा 28 में ते 5 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम व श्रीमद् भागवत कथा पारायण सोहळा भागवत कथाकार हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या समधुर वाणीतून 28 मे ते4जुन पर्यंत दुपारी 1 ते 4 यावेळत आयोजित करण्यात आली असून ब्रम्होत्सव उत्सव निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त समिती व उत्सव समिती यांनी केले आहे.
श्री. बालाजी मंदिर सिडको येथे 35 व्या वार्षिक बालाजी महोत्सव निमित्ताने 28 मेते5 जुनं पर्यंत दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे तर दैनंदिन धार्मिक कार्यक्रम मध्ये आचार्य पंडित सतिश गुरू सिडको व मंदिर पुजारी व्दियांशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने अभिषेक होमहवन, यासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आहे.


दि.28 में पासून हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या भागवत कथेला सुरूवात होणार आहे यजमान म्हणून रामचंद्र शंकरराव कोटलवार हे राहणार आहेत,तर 4 जुन रोजी सायं 7 वाजता श्री भगवान बालाजी व लक्ष्मी पदमवाती उत्सव मुर्ती मिरवणूक मंगल गिरी वाहनातून सिडको परिसरातील मुख्य मार्गावर काढण्यात येणार आहे, पारंपरिक वाघवृंद बॅण्ड बाजा,फटक्याचा आतिषबाजी व कलशधारी महिला सह भाविक भक्तांचा उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे,5 जुन रोजी हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या काल्याचा किर्तनाने व महाप्रसादाने सांगता होणार आहे.

वार्षिक ब्रम्होत्सव व धार्मिक कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष साहेबराव भिमराव जाधव, बाबुराव मारोतराव बिरादार सचिव ,व्यंकटराव कोंडलराव हाडोळे ,विश्वस्त सदस्य तुकाराम मल्लीकार्जुन नांदेडकर,
आनंद रामभाऊ बासटवार,डॉ.नरेश शंकरराव रायेवार,गोविंद राजाराम सुकेवार ,पुरुषोत्तम शंकरराव जवादवार,वैजनाथ बालाजी मोरलवार, रामचंद्र शंकरराव कोटलवार,पुंडलिक रावसाहेब बिरादार,सर्व उत्सव समिती श्री भगवान बालाजी मंदिर, सिडको, नांदेड यांनी केले आहे.
