HomeनांदेडMLA Bodhankar ; संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी,आमदार बोढांरकर यांनी केली पाहणी

MLA Bodhankar ; संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी,आमदार बोढांरकर यांनी केली पाहणी

नवीन नांदेड l संततधार पावसामुळे नांदेड तालुक्यातील किक्की, राहेगाव ,भायेगाव येथील शेतकऱ्यांची पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी थेट बांधावर 25 में रोजी जाऊन शेतकऱ्यांचा पिकाची पाहणी केली व महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे सुचना दिल्या.

नांदेड तालुक्यातील किक्की, भायेगाव ,राहेगाव येथे संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर पिके ज्वारी पिके अडावी पडली असुन भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा भायेगाव ग्राम पंचायत सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर,मंडळ अधिकारी, हेमंत सुजलेगावकर, कृषी सहायक सौ.मगर, तलाठी भांगे, व नुकसान ग्रस्त गावातील शेतकरी दतराम धोंडीबा खोसडे, गंगाधर माधव कोल्हे, सुरेश भाऊराव खोसडे,माधव बापुराव कोचार, पप्पु डिंगाबर कोल्हे,बालाजी डिंगाबर खोसडे, नागोराव गणपती कोल्हे, यांच्या सह गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.यावेळी महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची सुचना दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments