MLA Bodhankar ; संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी,आमदार बोढांरकर यांनी केली पाहणी
नवीन नांदेड l संततधार पावसामुळे नांदेड तालुक्यातील किक्की, राहेगाव ,भायेगाव येथील शेतकऱ्यांची पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी थेट बांधावर 25 में रोजी जाऊन शेतकऱ्यांचा पिकाची पाहणी केली व महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे सुचना दिल्या.
नांदेड तालुक्यातील किक्की, भायेगाव ,राहेगाव येथे संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर पिके ज्वारी पिके अडावी पडली असुन भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा भायेगाव ग्राम पंचायत सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर,मंडळ अधिकारी, हेमंत सुजलेगावकर, कृषी सहायक सौ.मगर, तलाठी भांगे, व नुकसान ग्रस्त गावातील शेतकरी दतराम धोंडीबा खोसडे, गंगाधर माधव कोल्हे, सुरेश भाऊराव ...
