Municipal Corporation ; मनपाने शास्ती मध्ये सहा दिवसांच्या वाढ मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची थकबाकी 110 मालमत्ता धारकाकडून 48 लाखांची वसुली – NNL

नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने लोक अदालत नंतर शास्ती मध्ये सहा दिवसांच्यी वाढ केल्या नंतर जवळपास 110 मालमत्ता धारकांनी धनादेश , आँनलाईन व नगदी 48 लाख‌ 495 वसुली झाली असून गतवर्षीचा तुलनेत या कार्यालयाने वसुली मध्ये भरारी घेतली आहे, एकुण लोक अदालत सह 1कोटी 38 लाख वसुली झाली आहे.

मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास 353 थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत रोख व धनादेशव्दारे 90 लाख 81 हजार 77 रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले होते,आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,यांच्या मार्गदर्शना खाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपा व‌ जिल्हा विधी सेवा‌ प्राधीकरण नांदेड जिल्हा न्यायालय यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन करण्यात आले होते.

थकीत असलेल्या जवळपास जवळपास 2550 मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग,प्रकाश दर्शने, यांच्या माध्यमातून वसुली लिपीक नथुराम चवरे ,विवेकानंद लोखंडे,रमेश यशवंतकर, रविंद्र पवळे,सुधीर कांबळे,नरसिंग कुलकर्णी,दिपक जौधंळे,राहुल पाईकराव,यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील जवळपास 2550 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

14 डिसेबंर आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये मालमत्ता धारकांना थकीत शास्तीवर 80/ टक्के सुट देण्यात आली होती, यावेळी परिसरातील जवळपास 353 मालमत्ता धारकांनी सहभागी होऊन रोख व धनादेश व्दारे 90 लाख 81 हजार 77 रुपये कर भरणा केला होता ,या नंतर आयुक्त यांनी सहा दिवसांच्यी 20 डिसेबंर मुदतवाढ दिली होती,या सहा दिवसांच्या कालावधीत थकबाकी एकशे दहा मालमत्ता धारक यांच्या कडून आँनलाईन , धनादेश,व नगदी 48लाख 495 वसुली केली आहे. 31डिसेबंर 23चा गतवर्षीचा तुलनेत या वर्षी तिनं कोटी 50लक्ष रुपयेने वाढ झाली आहे.

सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक संजय नागापूरकर, वसंत कल्याणकर ,मारोती सारंग ,प्रकाश दर्शने यांच्या सह वसुली लिपीक यांनी वसुली साठी सहकार्य केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button