करियरनांदेड

Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL

नांदेड| शहरातील श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी सार्वजनिक रोडवर हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडून कार्यवाही करणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान करण्यात आला आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 05/10/2024 रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर हद्दीत श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी आरोपी नामे कश्यप सुनिल हटकरे हा हातात तलवार घेवुन, लोकांना मारहाण करीत परीसरात दहशत पसरवित होता.

यामुळे भितीपोटी तेथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यावेळी तेथुन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. 1138 बालाजी तेलंग यांनी जिवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने एकटयानेच सदर आरोपीवर ताबा मिळवुन, त्याचे हातातील तलवार काढुन घेतली व पुढील अनर्थ टाळला. सदर आरोपीस पोलीस ठाणे भाग्यनगर येथे नेवुन गु.र.नं. 493/2024 कलम 4/25 भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर पोलीस अंमलदार यांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रशस्ती पत्र देवुन, सन्मान करुन, त्यांचे कामगीरीचे कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button