नांदेड| मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपीना पो. स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगीरी करत 1 लाख 35,000 रूपयाचे 04 मोटार सायकल सह दोन आरोपी ताब्यात घेणे आहे.


अविनाश कुमार पोलीस अधिक्षक साहेव नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत नांदेड शहरातील मोटार सायकल चोरी संबधाने गुन्हे उघडकिस आनन्यासाठी सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश देण्यात आले होते. त्या अनुशंगाने दिनांक 09.10.20254 रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार पो.स्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे सदर गुन्ह्यातील मोटार सायकल चोरी करनारे 1) साईनाथ मारोती म्याकलवाड वय 19 वर्ष, रा. देविगल्ली धर्मावाद जि. नांदेड, 2) वॉवी भगवानराव जाधव वय 20 वर्ष, रा. सिद्धार्थनगर, बाळापुर, ता. धर्माबाद जि. नांदेड ह.मु वृंदावन धाबा धर्मावाद हे धर्माबाद येथे असल्याची माहीती मिळाली.

त्यावरून संबंधितास ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीतुन चार मोटार सायकली चोरल्याचे सांगुन सदर मोटारस सायकल हे श्रावस्तीनगर नांदेड येथील रोडच्या बाजुला असलेल्या नाल्याच्या बाजुला ठेवलेल्या काढुन दिल्याने 4 मोटार सायकल किं.अं. 1 लाख 35,000 रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठानी पथकाचे अभिनंदन केले आहे.

सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, किरतीका सी.एम. सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग नांदेड शहर, यांचे मार्गदर्शनाखाली, जालींदर ए. तांदळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो. स्टे शिवाजीनगर, किशोर गावंडे पोलीस उपनिरीक्षक पो. स्टे शिवाजीनगर, नांदेड, पोलीस अंमलदार पोहेकॉ अनिल झांबरे, पोकॉ। अझरोद्दीन शेख, राहुल लाठकर, लिंबाजी राठोड, देवसींग सिंगल, सरबजीतसींग पुसरी, मिथुन पवार, दत्ता वडजे सर्व नेमणुक गुन्हे शोध पथक पो. स्टे शिवाजीनगर, नांदेड, राजु सिटीकर सायबर सेल नांदेड यांनी संबंधित आरोपीला मुद्देमालसह अटक केली आहे. त्यांच्याकडून वेग वेगळ्या कंपनीच्या 4 मोटार सायकल एकुण 1,35,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
