Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL
नांदेड| शहरातील श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी सार्वजनिक रोडवर हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडून कार्यवाही करणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान करण्यात आला आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 05/10/2024 रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर हद्दीत श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी आरोपी नामे कश्यप सुनिल हटकरे हा हातात तलवार घेवुन, लोकांना मारहाण करीत परीसरात दहशत पसरवित होता.
यामुळे भितीपोटी तेथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यावेळी तेथुन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. 1138 बालाजी तेलंग यांनी जिवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने एकटया...
