उस्माननगर| लोहा तालुक्यातील मौजे पोखरभोसी येथे ४ जानेवारी 2025 रोजी 03.00 वा. चे सुमारास, फिर्यादीचे अर्धवट बांधकाम केलेल्या रूममध्ये घुसून, अज्ञात आरोपीने फिर्यादी राहात असलेल्या घरालगतच्या बांधकाम केलेल्या अर्धवट रूममध्ये ठेवलेली लोखंडी पत्राची पेटी फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केली आहेत.
बांधकाम केलेल्या अर्धवट रूममध्ये ठेवलेली लोखंडी पत्राची पेटी फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याच्या 10 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या किंमती 1,10,000/-रू चा मुद्देमाल व नगदी 50,000/- रू असा एकुण 1.60,000/- रू मुद्देमाल व सुटकेस मध्ये ठेवलेले शैक्षणीक कागदपत्र व इतर कागदपत्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
अशी फिर्यादी गोंविद व्यंकटराव भावे, वय 48 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. पोखरभोसी ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरनं 04/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहीता-2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन, पुढील तपास पोउपनि बगाडे, हे करीत आहेत.