नांदेड| पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला मिमांसा फाउंडेशन, दै. समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता पुरस्कार -2025 सोहळ्याचे आयोजन नांदेड विश्रामगृहातील सभागृहात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त देणात येणाऱ्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात विधानपरिषदेचे शिवसेना गटनेते आ. हेमंत पाटील, खा. रविंद्र चव्हाण, नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव बोंढारकर,हदगावचे आ. बाबुराव कोहळीकर, हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे पत्रकार सुरेंद्र गांगण,मॅक्स महाराष्ट्र मुबंईचे पत्रकार मनोज भोयर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, आयोजक रुपेश पाडमुख, सखाराम कुलकर्णी यांच्याहस्ते शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढाणाऱ्या महेंद्र गायकवाड यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या एकवीस वर्षांपासून महेंद्र गायकवाड यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.बिलोली सारख्या ग्रामीण भागातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महेंद्र गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी त्यांचा लढा नेहमीच असतो.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पत्रकारिता पुरस्कार व आंबेडकरी चळवळीतील “तुफानातले दिवे ” यासह विविध पुरस्कार महेंद्र गायकवाड यांना मिळाले आहेत.पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला आहे.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रुपेश पाडमुख व त्यांच्या निवड समितीने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.त्यांना मिळालेल्या विशेष सन्मानाबदल सामाजिक, राजकीय, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महेंद्र गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे.