Mahendra Gaikwad : पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात महेंद्र गायकवाड यांचा विशेष सन्मान -NNL
नांदेड| पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला मिमांसा फाउंडेशन, दै. समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता पुरस्कार -2025 सोहळ्याचे आयोजन नांदेड विश्रामगृहातील सभागृहात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त देणात येणाऱ्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात विधानपरिषदेचे शिवसेना गटनेते आ. हेमंत पाटील, खा. रविंद्र चव्हाण, नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव बोंढारकर,हदगावचे आ. बाबुराव कोहळीकर, हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे पत्रकार सुरेंद्र गांगण,मॅक्स महाराष्ट्र मुबंईचे पत्रकार मनोज भोयर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, आयोजक रुपेश पाडमुख, सखाराम कुलकर्णी यांच्याहस्ते शहरी व ग्रामीण...
