नांदेड| आमच्या लहानपणी आजची सहज उपलब्ध होणारी तंत्रज्ञान नव्हती. यामुळे आम्ही कष्टाळु,मेहनती व उर्जावान घडू शकलो.तुमचे आईवडील कष्ट,मेहनत गरिबीची जाणीव होऊ देत नाहीत. ते तूमच्यावर जिवापाड प्रेम करतात.ते स्वतः काबाडकष्ट करतात पण तुम्हाला काहिच कमीपडू देत नाही. यामुळे आई वडील यांची सेवा करा. त्यांना दु:ख होईल असे वर्तन असे वागू नका.प्रसारमाध्यमाचा मोबाईलचा वापर योग्य पध्दतीने करा. विविध विषयाच्या अभ्यासाठी करा. असे मत विद्याथ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.या प्रसंगी ‘मस्करी’ कथा आपल्या ग्रामीण बोली भाषेतून सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
दर्पण दिनानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या प्रसारमाध्यम वर्तमानपत्र, इलेक्ट्रानिक मिडियातील पत्रकार उद्याचा मराठवाडा चे वृत्त संपादक तथा प्रसिद्ध कथाकथनकार राम तरटे,दैनिक सत्य मराठी चे मुख्य संपादक आयुष पठाण,नांदेड चौफेर चे मुख्य संपादक आरिफ पठाण,लोक सहाराचे पत्रकार राहुल तारु यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन या विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी मनपा तथा साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तर केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फरहत बानो, सिमा देवरे, मो युसुफ, शिक्षीका सविता पाटील, मुक्ता गोरगिळे, वैशाली कुलकर्णी, प्रियंका वाकडे, शिक्षक सलिम शहेजाद, युसुफ खान, नुरुन्नीसा शेख, शाजिया खान,सदफ मोहम्मद,वसिम बानो,शाहिन अब्दुल ,सुमय्या खुटानबुजे,सफाना समरीन, अखतरी बेगम,आसीया ,नाजेमा बेगम, मोहमद जलील, नामदेव वाघमारे,कपिल वाघमारे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सिमा देवरे, आभार मुक्ता गोरगिळे यांनी मानले.