Bhagyashree Jadhav : राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

olamiyad Bhagyashree Jadhav : राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

नांदेड| नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या २४ व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप-२०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळेस्थान निर्माण केलेले आहे. सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्यांनी २७ सुवर्ण,४ रौप्य व ७ कास्य पदकांवर आपले नाव कोरले आहे. एकूण ३८ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे.

सन २०२१ मध्ये टोकिओ व २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे सौभाग्य त्यांना लाभले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवादक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव यांना मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी- वर्ग एक या पदावर नियुक्ती दिली आहे.

IMG 20260322 WA0068 Bhagyashree Jadhav : राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

भाग्यश्री जाधव यांनी ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे दि.१६ मार्च ते दि.२२ मार्च २०२६ कालावधीत झालेल्या २४ व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत गोळा फेक व भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून दोन सुवर्णपदक जिंकले आहेत.

माझे मुख्य प्रशिक्षक सी. सत्यनारायण, सह प्रशिक्षिका श्रीमती पुष्पा मॅडम, प्रशिक्षक प्रशांत वाघ, गुरुबंधू पत्रकार प्रकाश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर व प्रसिद्ध व्यापारी शशिकांत पाटील जुन्ने बेळीकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा यामुळेच मी हे यश संपादन करू शकले, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना जाधव यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top