jewellery theft : दागिने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 4,89,502/- रूपयांच्या मुद्देमालासह जाळ्यात

नांदेड| पोलीस स्टेशन ग्रामीण नांदेड हद्दीत दागीने चोरीच्या गुन्हयातील आरोपी 4 लक्ष 89 हजार 502 रूपयाच्या मुद्देमालासह जाळयात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी हि कार्यवाही तेलंगणा राज्यातील निझामाबाद रेल्वे स्थानकावर सापळा रचून केली आहे. सदरची कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 02.08.2023 रोजी प्रशांत प्रभाकरराव डहाळे व्यवसाय व्यापार रा. बालाजी मंदीराजवळ सिडको, नांदेड हे त्यांचे गुरूकृपा ज्वेलर्स सिडको येथील दुकान उघडण्यासाठी त्यांची स्प्लेंन्डर मोटार सायकलवर आले होते. मोटार सायकल दुकाना समोर उभी करून दुकान उघडत असताना त्यांचे मोटार सायकलचे डिक्की मधील सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात इसमांनी चोरून नेले होते. सदर प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सपोनि रवि वाहुळे स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे टिमने यापुर्वी सदर गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून एका आरोपीस यापुर्वी अटक करून त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले 8,18.419/- रू किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने जप्त केले होते.

गुन्हयातील उर्वरीत आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड उदय खंडेराय यांना केले होते. त्यावरून सपोनि रवि वाहुळे व टिमला दिनांक 23.07.2025 रोजी पोलीस पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मीळाल्यावर आरोपी मखान प्रधान रा. दासननीया जि. जाजपुर राज्य ओडीसा हा ट्रेनने विशाखापट्टनम येथुन निजामाबाद येथे गुन्हयात चोरलेले सोने विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली.


त्यावरून निजामाबाद रेल्वे स्टेशनच्या बाहेर सापळा लावुन आरोपी देवा ऊर्फ मखान पि. मारिया प्रधान वय 20 वर्ष, व्यवसाय बेकार रा.दासमनीया जिल्हा जाजपुर, राज्य ओडोसा यास ताब्यात घेतेले. त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेले सोन्याचे व चांदीचे दागीने किंमत 4,89,502/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपीस मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.




