नवीन नांदेड। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संवीधान प्रतिकृती विटंबना झाली होती,बंद दरम्यान हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरूणांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणी चौकशी करण्यात यावी यासह प्रमुख मागण्यासाठी नवीन नांदेड भागात 16 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला.
यावेळी विलास गजभारे, राजु लांडगे, प्रसेनजित वाघमारे,सम्राट अढाव, विठ्ठल गायकवाड,अशोक मगरे ,यांच्या नेतृत्वाखाली हडको ते सिडको मुख्य मार्गावरून माता रमाई आंबेडकर चौक येथे निषेधार्थ मोर्चा काढुन घोषणा देण्यात आल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर नवीन नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ परिसरातील विविध प्रतिष्ठाने व शाळा,महाविघालय बंद होते, सिडको भागात जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सिडको भागातील पोलीस सुरक्षा व्यवस्था आढावा घेतला तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
प्रारंभी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जमलेल्या नागरीक युवक व पदाधिकारी यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यु प्रकरणी चौकशी झाली पाहिजे,यासह विविध मागण्या करण्यात आल्या, यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो,प्रचंड घोषणाबाजी करत सदरील निषेध मोर्चा हडको व सिडकोतील प्रमुख रस्त्याने माता रमाई आंबेडकर चौक येथे आली.या निषेध मोर्चा मध्ये माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड,प्रदिप हनवंते, शाहीर गौतम पवार, व्यंकट इंगळे, ॲड.संदीप गायकवाड,अमृत नंरलगकर, धम्मा गोपाळे,पि.एस.गवळे साहेबराव भंडारे, गौतम डुमणे, जगदीश भुरे, मनोज नांदेडकर, आकाश सोनसळे, संदीप महाबळे, सावंत मामा, गौरव दरबस्तवार,अनिल मोरे, सुनिल वडगावकर यांच्यासह पदाधिकारी, युवक,नागरीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंदच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, उपनिरीक्षक महेश कोरे,ज्ञानेश्वर मठवाड,विश्वदिप रोडे, चव्हाण, गायकवाड व पोलीस अंमलदार, महिला पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सिडको हडको परिसरातील मुख्य बाजारपेठ सह महाविद्यालय लातूर फाटा येथील किराणा दुकान ,हाॅटेल ,भाजीपाला मार्केट कडकडीत बंद होते तर वाहतूक तुरळक प्रमाणात चालू होती.