नांदेड| कार्यक्रमाचे उद्घाटण पोलिस उपअधिक्षक डाॅ.अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. प्रमुख पाहूणे ज्येष्ठतम् नागरिक मा. सुभाषजी बार्हाळे, सौ.निर्मलाताई बार्हाळे, वजिराबाद पो.ठाणे प्रमुख परमेश्वरजी कदम, ज्येष्ठतम् विधिज्ञ जनाब एम झड सिद्दिकी, सुप्रसिद्ध विधिज्ञ मा.विजयाताई भरकड, प्रभाकर कुंटूरकर, गिरिष बार्हाळे, रामचंद्र कोटलवार,ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र माधवराव पवार, डाॅ.सौ. ज्योतिताई डोईफोडे, मिर्झा बेग, आदिच्या प्रमुख उपस्थितीत तर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील 250 ते 300 गरिब,गरजवंत, दुःखी कष्टी, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित त्रस्त, शोषित, पिडित, ज्येष्ठ नागरिकांच्या व मा. सौ. हडसनकर, श्रीमती प्रभा चौधरी, योगा गुरू श्रीमती हुरने, श्री व सौ सुश्मा गहिरवार, श्रीमति खान, सुप्रसिद्ध गायक सुरजित सिंघ पूजारी, महिला सहाय कक्ष पो. अधिकारी तथा गाण कोकीळा सौ.मीरा वच्छेवार, प्रसिद्ध गायक श्री शिवाजी टाक, भजन सम्राट अण्णा तथा संच आणि नांदेड शहर तथा ग्रामिण जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी तथा सदस्य आणि निमंत्रितांदिं च्या साक्षिने बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.


खा.नागेशजी पाटील अष्टीकर मुंबई नांदेड रेल्वे प्रवासात अडकल्यामुळे अतिव ईच्छा असूनहि कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याची तसेच न्या.शरदचंद्रजी देशपांडे साहेब प्रबळ ईच्छा असूनही कांही अपरिहार्य घरगुत्ती कारणामुळे रात्रीच जन्म गावी जावे लागल्याने अनुपस्थित राहाणे भाग पडल्याची खंत तसेच कार्य क्रमास सुभेच्छा दिल्याचेही डाॅ.हंसराज वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगीतले. मा.पोलीस उपअधिक्षक (गृह) डाॅ.अश्विनीताई जगताप यांनी आज जागतिक “फादर्स डे” च्याही उपस्थिताना सुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांचे शोषण,त्यांच्यावरील होणारे आत्याचार “ज्येष्ठ नागरिक आत्याचार निवारण कक्ष (भरोसा सेल)” च्या माध्यमातून या पुढे मुळिच खपऊन घेतल्या जाणार नाहित व आम्ही विशेष काळजी घेऊ असे निक्षूण सांगीतले.

सुप्रसिद्ध विधिज्ञ विजयाताई भरकड यांनी 2007चा कायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे “कवच कुंडलं” असल्याचे सविस्तर सांगून 2010 चे नियम व 2013 चा कायदा हे ज्येष्ठ नागरिकांनां “वरदान” असल्याचे कथन केले. ज्येष्ठांसाठी जिल्हा विधी प्राधीकरण विभाग म्हणजे कायद्याचे सहज,सुलभ, विना विलंब, अखर्चिक तथा विनामुल्य कायद्याचे खरे “न्याय प्रदान करण्याचे दालन” असल्याचे सांगून आम्ही सदैव सहर्ष आपल्या सेवेत असल्याचे सांगीतले. पिडित ज्येष्ठ नागरिकांना कांही महत्वाचे दूरध्वनी क्रमांक दिले. ज्येष्ठतम् विधिज्ञ जनाब एम.झड. सिद्दिकी साहब यांनीही ज्येष्ठांच्या पारित अनेक कायद्यांचा उहापोह करून शेवटच्या श्वासा पर्यंत मी ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याच्या कुठल्याही आडचणिच्या बाबतीत विना मुल्य सेवेस सदैव तयार असल्याचे सांगीतले. सभेला आलेल्या उपस्थित पिडित तथा आत्याचारितांच्या अनेक विविध प्रश्नांचेही निराकरण करण्यात आले.

अध्यक्षिय समारोपात आजची गरजवंत,दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित, शोषित,पिडित तथा आत्याचारित ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून सुभाषजी बार्हाळे यांनीं आश्चर्य व्यक्त केले. खरच शासनाने या ज्येष्ठ नागरिक समूहाच्या आत्याचार मुक्तीसाठी त्यांना त्वरित विशेष दर्जा प्रदान अर्थात “राष्टीय संपत्ती” म्हणून घोषणा,ज्येष्ठ नागरिक धोरण व पारित कायद्याची तंत्तोतंत अंमल बजावनी,विशेष बाब म्हणून खास ज्येष्ठांसाठीच योजना,एक महिला व एक पुरूष प्रतिनिधी विधान सभेवर व राज्य सभेवर घेण्याची तरतूद आणि या वयात अर्थिक स्थैर्यासाठी “मानधन तथा सन्मान धन” देणे अगत्याचे असल्याचे ठासून सांगितले. डाॅ.लक्ष्मीताई पुरणशेट्टीवार यांंनी कार्यक्रमाचे सुबक व नेटके सूत्र संचलण केले तर डाॅ.पुष्पा कोकीळ यांनी उपस्थितांचे थोडक्पात अभार मानले.
