नांदेड| पोलीस प्रशासन आणि समाज यांचा एक घनिष्ट संबंध असतो. पोलीसांच्या कामकाज पध्दतीचा परिणाम समाजावर पडत असतो. पोलीस प्रशासन 24X7 समाजासाठी कार्यरत असतात. अशा वेळी दैनंदिन कामकाजाशिवाय सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विधायक कार्य करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली “मिशन सहयोग” ची सुरूवात करण्यात आली. “मिशन सहयोग” अंतर्गत नाविन्यपूर्ण 1. ऑपरेशन बीट कनेक्ट, 2. मिशन उडान, 3. ऑपरेशन वारसा जतन, 4. नांदेड पोलीस लीग (NPL), 5. मिशन निर्भया, 6. मिशन समाधान, 7. मिशन निर्धार, 8. मिशन एकता असे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.


सध्या नांदेड शहरातील शाळा/कॉलेज व क्लासेस उन्हाळी सुट्यानंतर परत सुरू झाल्यामुळे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे आदेशान्वये विदयार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने दामिनी पथक व सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक यांनी शहरातील वेगवेगळ्या शाळा/कॉलेज आणि क्लासेस येथे भेटी दिल्या तसेच अनेक ठिकाणी पोलीसांनी साध्या वेशात भेट दिली हे विशेष आहे.


विदयार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने “मिशन सहयोग उपक्रमां पैकी “मिशन निर्भया” अंतर्गत दिनांक 19.06.2025 रोजी मार्गदर्शन सत्र आयोजित करून नांदेड शहरातील महात्मा फुले हायस्कुल बाबानगर येथे जयश्री गिरे, महिला सहा. पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार, दामिनी पथक, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी भेट देवून विदयार्थीनीशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी बाबत चर्चा केली. तसेच स्वसुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन करून पोलीस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकाबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेत शिक्षकांसह जवळपास 1500 ते 1600 शालेय विदयार्थीनी सहभाग घेतला होता.


तसेच आज रोजी सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक अंतर्गत चार्ली पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शहरातील 1. यशवंत कॉलेज बाबानगर, 2. भार्गव क्लासेस, 3. इंदिरा गांधी सिनियर कॉलेज, 4. गुजराती हायस्कुल, 5. शिवाजी विदयालय, 6. प्रतिभा निकेतन हायस्कुल, 7. नारायणराव भालेराव हायस्कुल, 8. राजीव गांधी कॉलेज, 9. सायन्स कॉलेज, 10. पिपल्स कॉलेज, 11. राजश्री शाहू विदयालय, 12. महात्मा फुले हायस्कुल बाबानगर, 13. केब्रीज विदयालय शिवाजीनगर अशा एकुण 13 शाळा व कॉलेज येथे भेटी देवून कॉलेज व शाळा प्रशासनाशी मुलीच्या सुरक्षा संदर्भात व टुकार मुलांचा बंदोबस्त व कारवाई बाबत चर्चा केली तसेच विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे शंकाचे समाधान केले. विदयार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने व मदतीकरीता दामिनी पथक, डायल 112 व पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्याबाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आवाहन केले आहे.
