धार्मिकनांदेड

Himayatnagar Eid : हिमायतनगर ईदसाठी सज्ज ; नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनाला वेग

लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह परिसरात मूलभूत सुविधा

हिमायतनगर,अनिल मादसवार | पवित्र रमजान ईद (ईद उल फित्र) सणाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी नगरपंचायतीकडून सर्वंकष तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह परिसरात मूलभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गुरुवार, दि. १९ मार्च रोजी नगराध्यक्षांनी ईदगाह कमिटी, पोलीस प्रशासन, नगरपंचायत अधिकारी तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करत तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, अखंडित वीजपुरवठा, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियोजन यावर विशेष भर देण्यात आला.

ईदच्या दिवशी परिसरात विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात येणार असून, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकले जात असून, पार्किंग व्यवस्था, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकाचीही सज्जता ठेवण्यात आली आहे. तसेच शहरात सुरळीत पाणीपुरवठा व वीज सेवा कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

“ईद हा बंधुभाव, शांतता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सण आहे. सर्वांनी परस्पर सहकार्याने व सलोखा राखत हा सण आनंदात साजरा करावा,” असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे यंदाची ईद अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button