करियरनांदेड

scholarship ; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

छत्रपती संभाजीनगर| अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर तात्काळ सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले आहे.

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in  प्रणाली कार्यान्वीत झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील (fresh) नविन तथा (Renewal) नुतनीकरण अर्ज महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती मोरे यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button