हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेमध्ये संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत विदर्भातील रामेश्वर तांडा, कळमनुरी येथील जय सेवालाल संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून परमेश्वराचा आशीर्वाद मिळविला आहे. या विजय संघाला मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते , एड दिलीप राठोड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि पहिल्या क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.


हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला दिनांक ९ मार्च रोजी दुपारी सुरुवात करण्यात आली होती. या स्पर्धेत सहा कबड्डी संघाने सहभाग घेतला असून, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या स्पर्धेमुळे यात्रेमध्ये चांगलीच रंगत आली होती. फायनल स्पर्धा रात्री आठ वाजेपर्यंत प्रकाश झोतात चालविण्यात आली. शेवटच्या फायनल स्पर्धेने उपस्थित प्रेक्षकांना खिळून ठेवत कबड्डी संघाने वाहवा मिळवली. फायनलची स्पर्धा जय सेवालाल संघ कळमनुरी आणि जय सेवालाल उमरहिरा तांड्याच्या कबड्डी संघामध्ये अटीतटीत झाली. यामध्ये जय सेवालाल संघ कळमनुरीने विजय मिळविला.

त्यामुळे जय सेवालाल उमरहिरा तांड्याच्या संघाला दुसऱ्या क्रमांक जाहीर करून 15 हजाराचे बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर मालकागुडा पाटोदा क्रीडा संघ तालुका किनवट या संघाच्या खेळाडूंनी तिसऱ्या क्रमांकाचे 09 हजाराचे बक्षीस देण्यात आले आहे. या सर्व विजयी संघाचे मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, क्रीडा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एड दिलीप राठोड, उपाध्यक्ष सूर्यकांत ताडेवाड, बाबूराव बोड्डेवार, सचिव के बी शनेवाड, पंच बी आर पवार, सोनबा राऊत, गजानन ताडकुले, बबलू काळे, तुकाराम अडबलवाड, अशोक अनगुलवार, बाळासाहेब हरडपकर, यात्रा सब कमिटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, यात्रा करमणूक विभागाचे अध्यक्ष राम नरवाडे, पापा पार्डीकर, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, प्रवीण कोमावार, माने सोनारीकर, मारोती वाघमारे, अर्जुन राऊत, जाधव सर, दत्ता देवकते, राजू राहुलवाड, आदिंसह क्रीडा प्रेमी नागरिक व खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.
