Saturday, May 16

Tag: Vidarbha wins the Kabaddi tournament

the Kabaddi tournament : श्री परमेश्वर यात्रेतील कबड्डी स्पर्धेत विदर्भाच्या कळमनुरी येथील जय सेवालाल संघाने मारली बाजी

the Kabaddi tournament : श्री परमेश्वर यात्रेतील कबड्डी स्पर्धेत विदर्भाच्या कळमनुरी येथील जय सेवालाल संघाने मारली बाजी

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेमध्ये संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत विदर्भातील रामेश्वर तांडा, कळमनुरी येथील जय सेवालाल संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून परमेश्वराचा आशीर्वाद मिळविला आहे. या विजय संघाला मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते , एड दिलीप राठोड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि पहिल्या क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला दिनांक ९ मार्च रोजी दुपारी सुरुवात करण्यात आली होती. या स्पर्धेत सहा कबड्डी संघाने सहभाग घेतला असून, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या स्पर्धेमुळे यात्रेमध्ये चांगलीच रंगत आली होती. फायनल स्पर्धा रात्री आठ वाजेपर्यंत प्रकाश झोतात चालविण्यात आली. शेवटच्या फायनल स्पर्धेने...
error: Content is protected !!