HomeनांदेडPreacher Gonewad : सदगुरूंच्या सानिध्यात राहून भक्ती केल्यास जिवन फलदायी ठरते -...

Preacher Gonewad : सदगुरूंच्या सानिध्यात राहून भक्ती केल्यास जिवन फलदायी ठरते – प्रवचनकार गोणेवाड

हिमायतनगर| सदगुरूंच्या सानिध्यात राहून मनोभावे भक्ती केली पाहिजे आपल्या सुखी जिवन जगण्याची प्रेरणा हि भक्ती मार्गातूनच मिळते म्हणून प्रत्येक भक्तांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी सांगितलेल्या मार्गाने भक्ती करावी त्यांच्या कृपेने जिवनातील संकटं दुर होतील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार अंगीकारले तर जिवन फलदायी ठरेल असे मत सत्संग सोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षक जयराम गोणेवाड यांनी भाविकांशी बोलतांना केले आहे.

कारला येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संतसंग सेवा केंद्र समितीच्या वतीने लिलाअमृत पारायण , दिवसभर हरिनामाचा गजर सायंकाळी हनुमान मंदिर सभागृहात प्रवचनकार जयराम गोणेवाड यांचे प्रवचन झाले उपस्थित भक्तांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सानिध्यात राहून भक्तांनी जिवन सफल करून घेतले पाहिजे अशा संतांच्या सहवासामुळे आपल्या पिढीचा उध्दार नक्कीच होतो हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीने आपली संस्कृती जपून ठेवत संतांच्या विचाराने वागले तर भविष्यात दुगृण वाट्याला येणार नाहीत.

narendra Preacher Gonewad : सदगुरूंच्या सानिध्यात राहून भक्ती केल्यास जिवन फलदायी ठरते - प्रवचनकार गोणेवाड

केवळ संसारात गुरफटून न जाता देवाची भक्ती करा,देव भावाचा भुकेला आहे , देवावर श्रध्दा ठेवून कार्य केल्यास जिवनाचा प्रवास फलदायी ठरेल असे गोणेवाड यांनी प्रवचनात सांगितले आहे.यावेळी कारला येथील भक्तगण तालुका सेवा समितीचे सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व गुरु बंधू शिष्य,साधक, उपासक,भक्त, युवा समिती,महिला समिती सर्वांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments