HomeनांदेडMeghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

Meghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली व डोंगरगाव येथे दौरा करुन ग्रामस्‍थाशी संवाद साधला. बारड येथे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला सतेच घरकुल बांधकामाला गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर विहीर तसेच 4 लाख 20 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची पाहणी केली. सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा होत असून, नव्याने सुरू झालेल्या योजनेव्‍दारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली त्यांनी दिल्या.

IMG 20250401 210413 Meghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौराग्रामस्तरावर ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी सेग्रीगेशन शेड उभारण्याचे तसेच गावातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे निर्देशही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्‍या. गावात स्‍वच्‍छतेसाठी जनजागृती वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बारडच्या सरपंच मंगलताई बुरडे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, उप कार्यकारी अभियंता वाडीकर, वेरूळकर, ग्राम पंचायत अधिकारी अनुप श्रीवास्तव, कंत्राटदार काझी, दिगंबर टिप्परसे, भगवान पुयड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्यक शुभम तेलेवार उपस्थित होते.

IMG 20250401 210328 Meghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

सीईओ मेघना कावली यांची पंचायत समितीला आकस्मिक भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी मुदखेड पंचायत समितीला अचानक भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना तसेच अन्य योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी एस. एच. बळदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments