Thursday, May 14

Tag: visit to Mudkhed taluka

Meghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

Meghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली व डोंगरगाव येथे दौरा करुन ग्रामस्‍थाशी संवाद साधला. बारड येथे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला सतेच घरकुल बांधकामाला गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर विहीर तसेच 4 लाख 20 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची पाहणी केली. सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा होत असून, नव्याने सुरू झालेल्या योजनेव्‍दारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली त्यांनी दिल्या. ग्रामस्तरावर ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी सेग्रीगेशन शेड उभारण्याचे तसेच गावातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे निर्देशही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्‍या. गावात स्‍वच्‍छतेसाठी जनजागृती वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्...
error: Content is protected !!