HomeनांदेडMahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो :...

Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

हिमायतनगर, अनिल मादसवार | मागील 24 तासांपासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेले कामारी गाव हे बहुसंख्य लोकसंख्येचे असून गावाला लागून असलेल्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीचे पाणी गावात शिरले. परिणामी गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

534717488 23915131048189667 5573861942702163133 n Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन व कापूस पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यापूर्वी पावसा अभावी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला होता. आता पुरामुळे पुन्हा मोठा धक्का बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

515507109 23915126881523417 4376551664507405179 n Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी पुत्र महेश शिरफुले कामारीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments