Gudi Padwa : गुढीपाडव्याने दिला शेतीला नवा श्रीगणेशा; बळीराजाचा उत्साह ओसंडून वाहला !

FB IMG 1773905641293 Gudi Padwa : गुढीपाडव्याने दिला शेतीला नवा श्रीगणेशा; बळीराजाचा उत्साह ओसंडून वाहला !

हिमायतनगर, अनिल मादसवार|  मराठी नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुडी पाडवा निमित्त हिमायतनगरसह ग्रामीण भागात पारंपरिक उत्साहाचे दर्शन घडले. बळीराजाने ‘काळ्या आई’ची विधीवत पूजा करून शेतात तास मारत नव्या हंगामाची मुहूर्तमेढ रोवली, तर घराघरांत उंच गुढ्या उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीच्या अवजारांची पूजा करत नव्या वर्षातील पीकपेरणीसाठी संकल्प केला. शेतात एकत्र येऊन नैवेद्य दाखवणे, गोड जेवणाचा आस्वाद घेणे आणि वनभोजनाचा आनंद लुटणे, अशा पारंपरिक प्रथा सर्वत्र पाहायला मिळाल्या.दरम्यान, महिलांनी घरोघरी आंब्याची तोरणे बांधून, गुढी उभारून सण साजरा केला. कडुलिंब, कैरी, चिंच, गूळ यांचे मिश्रण सेवन करण्याची आरोग्यदायी परंपरा देखील जपली गेली.

इतिहास, श्रद्धा आणि परंपरेचा संगमगुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात नसून विजय, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येला पुनरागमनाच्या स्मृतींना उजाळा देत हा सण साजरा केला जातो, अशी श्रद्धा आहे. वसंत ऋतूचे रंगही खुलले व संताच्या आगमनामुळे परिसरातील वृक्ष नव्या पालवीने बहरले असून, पळस, चाफा, गुलमोहर यांसारख्या फुलांनी निसर्गही रंगून गेला आहे.

IMG20260319103316 01 Gudi Padwa : गुढीपाडव्याने दिला शेतीला नवा श्रीगणेशा; बळीराजाचा उत्साह ओसंडून वाहला !
oplus_32

सणांची मालिका सुरू
या दिवसापासून रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती अशा विविध सणांची मालिकाच सुरू होत असल्याने वातावरण अधिक मंगलमय झाले आहे. एकूणच, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बळीराजाने नव्या आशा, संकल्प आणि उत्साहाने शेतीच्या कामाला प्रारंभ केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top