Wednesday, May 13

Tag: Baliraja’s enthusiasm overflowed!

Gudi Padwa : गुढीपाडव्याने दिला शेतीला नवा श्रीगणेशा; बळीराजाचा उत्साह ओसंडून वाहला !

Gudi Padwa : गुढीपाडव्याने दिला शेतीला नवा श्रीगणेशा; बळीराजाचा उत्साह ओसंडून वाहला !

नांदेड, कृषी, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार|  मराठी नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुडी पाडवा निमित्त हिमायतनगरसह ग्रामीण भागात पारंपरिक उत्साहाचे दर्शन घडले. बळीराजाने ‘काळ्या आई’ची विधीवत पूजा करून शेतात तास मारत नव्या हंगामाची मुहूर्तमेढ रोवली, तर घराघरांत उंच गुढ्या उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीच्या अवजारांची पूजा करत नव्या वर्षातील पीकपेरणीसाठी संकल्प केला. शेतात एकत्र येऊन नैवेद्य दाखवणे, गोड जेवणाचा आस्वाद घेणे आणि वनभोजनाचा आनंद लुटणे, अशा पारंपरिक प्रथा सर्वत्र पाहायला मिळाल्या.दरम्यान, महिलांनी घरोघरी आंब्याची तोरणे बांधून, गुढी उभारून सण साजरा केला. कडुलिंब, कैरी, चिंच, गूळ यांचे मिश्रण सेवन करण्याची आरोग्यदायी परंपरा देखील जपली गेली. इतिहास, श्रद्धा आणि परंपरेचा संगमगुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात नसून विजय, समृद्धी आणि नवचै...
error: Content is protected !!