नांदेड l येथील धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड मध्ये मागील सहा महिण्यापासून अधीक्षक पद रिक्तपदभर्ती साठी गुरुद्वारा प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ हे टाळाटाळ करीत आहेत. जर भर्ती करीत नसाल तर डिसेम्बर 2024 मध्ये पदभर्तीसाठी मागवलेले अर्ज त्वरित अर्जदारांना परत करुन कारण स्पष्ट करण्यात यावे अशी मागणी स. रविंदरसिंघ मोदी आणी एडवोकेट स. सुरेंदरसिंघ लोनीवाले यांनी संयुक्तरितिया निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्रचे प्रिंसिपल सेक्रेटरी, नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब आणी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. गुरबचनसिंघ सिलेदार यांना पाठविण्यात आली आहे.


प्रस्तुत निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, गुरुद्वारा सचखंड बोर्ड कार्यालया तर्फे डिसेम्बर 2024 महिण्यात रिक्त होणाऱ्या अधीक्षक (सुपरिंटेंडेंट) पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी पंजाब आणी महाराष्ट्राच्या काही वर्तमान पत्रात जाहिराती सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. एका महिण्यात दोन वेळेस जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.

जाहिरातीला प्रतिसाद देत नांदेड येथील सहा ते सात उम्मीदवारांनी वरील पदासाठी रीतसर अर्ज प्रस्तुत केलेत. तत्कालीन अधीक्षक स. राजदेविंदरसिंघ कल्लाह हे दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सेवनिवृत्त होत असल्यामुळे जानेवारी महिन्यातच नवीन अधीक्षक निवडीसाठी प्रक्रिया पूर्ण करायला हवे होते. पण तसे न करता गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांनी प्रभारी अधीक्षक नेमून कारभार सुरु केला.

अर्ज मागवून सहा महीने लोटले असले तरी डॉ विजय सतबीर सिंघ तर्फे नवीन अधीक्षक नियुक्ति बद्दल कोणतीच कार्यवाही सुरु करण्यात आली नाही. त्यांच्या टाळाटाळास कंटाळून अर्जदार स. रविंदर सिंघ मोदी आणी अर्जदार एडवोकेट सुरिंदरसिंघ लोनीवाले यांनी संयुतरितिया अर्ज करुन प्रशासक महोदयांना प्रश्न उपस्थित केला आहे. जर अधीक्षक पदाची भर्ती करायची नव्हती तर मग वर्तमान पत्रात जाहिराती का प्रकाशित करण्यात आल्या.

अधीक्षक पदासाठी नांदेडच्या स्थानीक उम्मीदवारांनी अर्ज केल्यामुळेच डॉ विजय सतबीरसिंघ पक्षपाती भूमिकेतुन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून जर नवीन अधीक्षक निवड प्रक्रिया करायची नसेल तर आमचे अर्ज परत करून टाळाटाळ करण्याचे कारण सार्वजनिकपणे स्पष्ट करायला हवे असे नमूद करण्यात आले आहे.