मुखेड/मुक्रमाबाद,बसवराज वंटगिरे। मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 20 जून शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास दापका गुंडपंत शिवारात हायवा ट्रक मधून अवैद्यरित्या वाळू उपसा करून चोरी करणाऱ्या इसमावर धाडसी कार्यवाही करून तब्बल 28 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात मुक्रमाबाद पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कार्यवाही ने रेतीचा अवैद्य करणाऱ्यात खळबळ उडाली आहे.


मुक्रमाबाद पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना दापका (गुं) शिवारात रोडवर अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली दरम्यान हायवा ट्रक क्रमांक एम एच 26 सीएच 6767 मध्ये लाल रेतीची नऊ ब्रास 45 हजार किमतीची विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना 28 लाख 45 हजाराचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध कलम 303 (2) सह कलम 48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाने अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अप्पर पो अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहा पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांच्या नियंत्रणात पो उ प नी मोरे व सपोउनी कदम यांच्या परिश्रमाने अवैध वाळू उपसा करून चोरी करणाऱ्या इसमा विरुद्ध कार्यवाही केली. सदरची उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस अधीक्षक नांदेड यांनी मुक्रमाबाद पोलीस पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले.
