Wednesday, May 13

Tag: accelerates planning

Himayatnagar Eid : हिमायतनगर ईदसाठी सज्ज ; नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनाला वेग

Himayatnagar Eid : हिमायतनगर ईदसाठी सज्ज ; नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनाला वेग

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार | पवित्र रमजान ईद (ईद उल फित्र) सणाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी नगरपंचायतीकडून सर्वंकष तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह परिसरात मूलभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवार, दि. १९ मार्च रोजी नगराध्यक्षांनी ईदगाह कमिटी, पोलीस प्रशासन, नगरपंचायत अधिकारी तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करत तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, अखंडित वीजपुरवठा, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. ईदच्या दिवशी परिसरात विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात येणार असून, उन्हाचा त्रास होऊ नय...
error: Content is protected !!