नांदेड। येथील गुरुद्वारा तख्त सचखंड परिसर येथे शनिवारी सायंकाळी गुरु का खालसा या संस्थेच्या वतीने शीख धर्माचे 9 वें गुरु श्री तेगबहादर यांचा शहीदी सोहळा पाळण्यात आला.


शहीदी सोहळ्याच्या अनुषंगाने दि. 2 ते दि. 7 डिसेम्बर दरम्यान सुखमनी साहेबचे पाठ आणी कथा सारखे कार्यक्रम झाले. यावेळी गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणी पंजप्यारे साहिबान तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक राजदेवेन्द्रसिंघ कल्लाह यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. गुरुद्वाराचे मीत ग्रंथी भाई गुरमीतसिंघ पुजारी, ज्ञानी मंजीतसिंघ लंगरसाहिबवाले, ज्ञानी तनवीरसिंघ यांनी धार्मिक कथा करत गुरु तेगबहादुर जी यांच्या बलिदानाचे प्रसंग सांगितले.


सन 1675 मध्ये गुरु तेगबहादुरजी यांनी हिन्दू धर्म रक्षणार्थ दिल्लीच्या चांदनी चौक येथे बलिदान दिले होते. तिथिनुसार वरील कालावधीत नांदेड मध्ये हा शहीदी सोहळा श्रद्धाभावाने पाळण्यात आला. गुरु का खालसा संस्थेचे अध्यक्ष स. कश्मीरसिंघ भट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी परगटसिंघ सिलेदार, जसबीरसिंघ चड्डा, राजेंद्रसिंघ सिद्धू, हरभजनसिंघ भट्टी, गुरमीतसिंघ रागी, गुरचरणसिंघ भाटिया, सत्कीरतसिंघ गुरमुख प्यारे, बलजीतसिंघ खालसा, हरभजनसिंघ दिगवा, सुखदेवसिंघ भट्टी सह मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते.
