हिमायतनगर| तालूक्यातील एकंबा येथे जलजिवन मिशन अंतर्गत चे पाणी पुरवठ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम जनतेच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची जायमोक्यावर सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
एकंबा येथे कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून लाखो रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. या प्राप्त निधीतून गेल्या काहिं दिवसांपासून अतिशय कासव गतीने या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामात मोठी अनियमितता असून ठेकेदाराने प्रशासकीय यंत्रनेला मॅनेज करून मोठ्याप्रमाणात बोगस व निकृष्ट दर्जाचे काम तेहि निकृष्ट दर्जाचे उरकविले जात आहे. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ,भविष्यात भोगावे लागणाऱ्या परिणामांमुळे जनता त्रस्त झाली आहे.
जलजिवन च्या कामात पाईपलाईन करण्यासाठी अंतर्गत रस्ते खोदण्यात येणार असल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. आणी नागरीकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणारा आहे. चालू असलेल्या या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणे क्रमप्राप्त ठरत असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका सक्षम अधिकाऱ्यांमार्फत व तसेच एक विशेष समिती स्थापन करण्यात यावी. यासमितीसह क्वालीकंट्रोल मार्फत चौकशी करून ठेकादाराचे नाव काळया यादीत टाकून,या कामात मोठी अनियमितता असतांनाही सुधारीत मूल्यांकन करून ठेकेदारास अभय देणाऱ्या शाखा अभियंता, उप अभियंता व उपरोक्त दोषींवर कारवाई चा बडगा उगारावा. अशी मागणी एकंबा वाशियं जनतेतून पुढे आली आहे.