Hyderabad Gazetteer : हैदराबाद गॅझेटिअर नोंदीअनुषंगाने देगलूर तहसील कार्यालयात कार्यशाळा संपन्न

देगलूर,गंगाधर मठवाले| हैदराबाद गॅझेटिअर मधील नोंदी अनुषंगाने गावपातळीवर गठीत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षणार्थी सत्र व सेवा पंधरवडा अंमलबजावणीसाठी देगलूर तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची कार्यशाळा तहसील कार्यालय, देगलूर येथे आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेला मा. उपविभागीय अधिकारी श्री. अनुप पाटील, मा. तहसीलदार देगलूर श्री. भरत सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार श्री. विकास बिरादार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, सहा. कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे गॅझेटिअर मधील नोंदी व त्यांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीरीत्या करण्यास हातभार लागणार असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button