नांदेडलाइफस्टाइल

CIDCO ; सिडको परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर कचराच कचरा, स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष

नवीन नांदेड l सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या आठ दिवसांपासून परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे नाले साफसफाई न केल्याने संततधार पावसामुळे नाल्यातील घाण व परिसरातून आलेला कचरा विखुरलेला अवस्थेत रोडवर पसरल्याने नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन स्वच्छता विभागाने या कडे दुर्लक्ष केले असून तात्काळ साफ सफाई करावी अशी मागणी होत आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कार्यालय जवळ मुख्य मार्गावर व अंतर्गत रस्त्यावर संततधार पावसामुळे नाल्यातील घाण व‌ वाहुन आलेल्या कचरा विखुरलेला अवस्थेत वाहत आल्याने वाहन धारकासह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, विशेष म्हणजे मनपाच्या क्षेत्रीय कार्यालय जवळच हा कचरा मोठ्या प्रमाणात विखुरलेला अवस्थेत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे नाल्यातील व वाहुन आलेल्या कचरा विखुरलेला अवस्थेत इतरत्र ही मोठ्या प्रमाणात आहेत, स्वच्छता निरीक्षक, खाजगी कंपनीचे व्यवस्थापक यांच्या सह अनेक कर्मचारी कार्यरत आहेत मात्र या कडे दुर्लक्ष केले आहे, रोगराई पसरण्याचा आगोदर सिडको हडको परिसरासह विविध भागातील कचरा तात्काळ उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!