Homeक्राईमIllegal sand tipper : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पकडलेला अवैध रेतीटिपर तहसिलच्या आवारातून...

Illegal sand tipper : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पकडलेला अवैध रेतीटिपर तहसिलच्या आवारातून गायब

हरगांव, शेख चांदपाशा| तलाठी मंडळ अधिकारी यांनी हदगाव शहरात एक रेतीचा टिप्पर पकडला होता. मात्र रेतीया माफियाने सीसीटीव्हीच्या नजरेत असताना तहसील कार्यालयाच्या आवारातून तो टिपर पळविला असल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बाबत मिळालेली माहीती अशी की, मंडल अधिकारी विजय महाजन व तलाठी हसनाबादे शासकीय कामानिमित शहरात फिरत असताना शहरातील राठी चौक मध्ये अवैध वाळूचा भरलेला टिप्पर क्र MH30AB 46 76 आढळून आले. त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने टिपर मधील अवैध वाळूचा पंचनामा करून सदर वाळूचे वाहन तहसील कार्यालयांमध्ये जमा केले होते. परंतु दि. 20 मे 2025 रोजी सकाळी पाच साडेपाच दरम्यान तहसील कार्यातून हा टिपर रेतीमाफीयांनी पळविलेला आहे.

याबाबत मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक व टिपर मालकावर हदगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणखीन विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्यावरच सीसीटीव्ही असताना व तहसिल आवारात दोन्ही बाजूला प्रथम लोखडी गेट असतांना अवैध रेतीचा टिप्पर पळवण्यात आल्याने तहसील प्रशासनाची कार्यशैली कशी आहे…हे दिसून येत आहे .

तहसीलदार मीटिंगमध्ये….
हदगाव तालुक्यातील होणाऱ्या गौण खनिज चोरी संबधी महसुल विभाग फार चर्चेत आलेला आहे. या संबंधी माहीती घेण्यासाठी काही स्थानिक पत्रकार तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडमची भेट घेण्यासाठी गेले असता तहसीलदार मॅडम स्थानिय कर्मचाऱ्याच्या मिटींग मध्ये आहे अस सांगण्यात आले. सदर मिटींग संपली असता त्या लगेच V. C. मीटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार तिथेच थांबले असता असा निरोप देण्यात आला व तहसिलदार मॅडमची भेट न घेताच स्थानिय पत्रकारांना परतावे लागले.

जिल्हाधिकारी यांनी लक्ष दयायला हव…!
सध्या हदगाव तालुक्यात शासनाचे व केंद्र शासनाचे विविध विकासाची कामे चालू असून, यामध्ये प्रामुख्याने राज्य मार्गे राष्ट्रीयमहामार्ग व रेल्वेची कामे जोमात सुरू आहे. यांचे कंत्राटदार स्थानिक राजकीय नेत्यासह बड्या नेत्यांशी त्यांचे संबंध असल्याने कदाचित या संबंधाचा फायदा काही कंत्राटदार उचलत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गौण खनिजच्या तक्रारीत वाढ होताना दिसून येत आहे. आता जिल्हाअधिकारी राहुल कर्डीले यांनी लक्ष देणे गरजचे झाले आहे. कारण तहसिल कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेले वाहण पळविण्यात येत आहे. या मुळे गौण खनिज माफीयाची इतपत मजल गेलेली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments