नवीन नांदेड l हडको येथील श्री शनी मंदिर,श्री संकटमोचन हनुमान मंदिर देवस्थान येथे 22 व्या श्री शनी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक भक्तांनी विधीवत पूजन करून घेतले दर्शन यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.


27 में रोजी सोमवंती अमावास्या निमित्ताने 22 वा शनि जन्मोत्सव सोहळा श्रीशनी व श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे साजरा करण्यात आला यावेळी सकाळी 51 किलो तेलांचा अभिषेक श्री प्रविण महाराज टोंगे यांच्या अधिपत्याखाली मंत्रोच्चार व विधीवत पूजन करून साजरा करण्यात आला यावेळी शनि महात्म्य,महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

गेल्या तिस वर्षांनंतर यावर्षी श्री शंकर भगवान व लाडक्या शिष्यांचा जन्मोत्सव एकच दिवशी येत असल्याने सोमवंती अमावास्याला महत्त्व होते,27 में रोजी सकाळी 6 वाजता सामुदायिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर हनुमान चालीसा व शनिचालीसाचे पठण करण्यात आली व सकाळी 10 ते 12 शनि महात्म्य वाचन शिवकलाबाई पाटील , सौ.आशा संजय जोशी सुचक हभप गोविंदराव पाटील गिरे ,विठ्ठलराव गिते,हभप हभप सुरेश कल्याणकर, यांनी केले, आजीवन अभिषेक यजमान यांच्या हस्ते अभिषेक,तर श्री शनि जन्मोत्सव आजीवन अन्नदाते यांच्या हस्ते महाप्रसाद प्रसादाचे वाटप करण्यात आले.सोमवती अमावास्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती,विश्वस्त समिती अध्यक्ष करणसिंह ठाकूर,माधवराव कदम,गोपीनाथ कहाळेकर,संजय जाधव पाटील व विश्वस्त मंडळ यांनी परिश्रम घेतले.
