नांदेडसोशल वर्क

Cleanliness of Nav Ghat and Saibaba Mandir area ; सिडको मुख्य रोडवरील कचरा व महापुरामुळे नाव घाट व साईबाबा मंदीर परिसराची स्वच्छता – NNL

नवीन नांदेड| गणेशोत्सव निमित्ताने सिडको हडको, रविनगर कौठा परिसरातील मुख्य रस्त्यावर पुजाचे साहित्य विक्री करणाऱ्यानी साहित्य घेऊन गर्दी केली होती व रात्री उशिरापर्यंत विक्री नंतर राहिलेले साहित्य रोडवर ठेवल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा होत असल्याने तात्काळ सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या स्वच्छता विभागाच्या वतीने तात्काळ साफसफाई कर्मचारी, नालेसफाईचे कामगार, महिला पुरुष यांच्या साहाय्याने सफाई करून जवळपास १६ ट्रिप व्दारे कचरा उचलून सफाई केली तर नाव घाट, साईबाबा मंदीर देवस्थान कौठा वसरणी येथील गाळ जेटींग मशिन व जेसीबी मशीन सहाय्याने काढण्यात आला.

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव घाट व साईबाबा मंदीर देवस्थान कौठा वसरणी येथील पायरा व भाग गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे पुर्णपणे बुडाल्या नंतर पाणी औसरल्या नंतर गाळ मात्र मोठ्या प्रमाणात राहिल्याने भाविक भक्तांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती तर गणेशोत्सव निमित्ताने ७ सप्टेंबर रोजी सिडको हडको, रविनगर कौठा यासह इतर मुख्य बाजारपेठ असलेल्या मुख्य रस्त्यावर महापूजा साहित्य सह अनेक वस्तू विक्री साठी मोठया प्रमाणात विक्रेते आले होते, उशिरा पर्यंत विक्री करून राहीलेले साहित्य रस्त्यावर राहिल्याने ८ सप्टेंबर रोजी सकाळी वाहन धारकांना मार्गक्रमण करतांना कसरत करावी लागत असल्याने तात्काळ स्वच्छता विभागाने दखल घेतली.

मनपाचे आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु, सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, स्वच्छता विभाग प्रमुख वसिम तडवी, सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अर्जुन बागडी यांच्या साहाय्याने सिडको हडको परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेला कचरा महिला, पुरुष, साफसफाई, नाले सफाई कामगार, यांच्या सह ट्रकटव्दारे चार तासात १६ ट्रिप कचरा संकलन करून उचलून नेऊन परिसर स्वच्छ केला, तर साईबाबा मंदीर वसरणी कौठा भागातील पायरा व परिसरातील चिखल गाळ नाव घाट पुलावर साचलेले अलीकडे व पलीकडे दोन्ही बाजूंना चिखल जेसीबी, जेटींग मशिन व साफसफाई कामगार मार्फत स्वच्छ करून घेतला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button