हिमायतनगर। किनवट आगाराची महामंडळाची बसगाडी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर बसस्थानकात न येता किनवट, नांदेड मंदिराच्या दुसर्या कमानीपासूनच तिकडेच जात असल्याने प्रवाशी येथेच थांबून असताना किनवट लातूर बसगाडी निघून जात असल्याने प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.
किनवट, नांदेड महामंडळ बसगाडी लातूर, किनवट ही बसगाडी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हिमायतनगर येथे येते. ही बसगाडी हिमायतनगर येथील परमेश्वर बसस्थानकात येणे गरजेचे असते, कारण प्रवाशी हे बसस्थानकात बसगाडीची वाट पहात बसलेले असतात. या गाडीने नांदेड ला जाणारे प्रवाशी जास्त प्रमाणात असतात. ही गाडी नांदेड ला साडेदहा ते अकराच्या सुमारास नांदेड ला पोहचते, तेव्हा या बसगाडीने जावून दवाखान्याची कामे, कोर्टाची कामे, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे सोयीचे होतात.
परत सायंकाळी येणे ही सोयीचे होणार, अशी ही महत्वाची बसगाडी परमेश्वर मंदिर बसस्थानकात न येता किनवट वरून नॅशनल हायवे डायरेक नांदेड ला जात असल्याने प्रवाशी वैतागले आहेत. या बाबीची गंभीर दखल किनवट आगारप्रमूख व तसेच नांदेड आगारप्रमूख यांनी घेऊन लातूर बसगाडी परमेश्वर मंदिर बसस्थानकात दररोज नित्यनियमाने पाठवून प्रवाश्यांची गैरसोय थांबवावी. व तसेच किनवट, नांदेड बसगाडीच्या फेऱ्या वाढवाव्यात. अशी मागणी शिवसेना ( शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख राजू पाटील भोयर यांनी केली आहे.