HomeनांदेडOn the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील...

On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL

नवीन नांदेड| गणगौरी लक्ष्मी सणासाठी मुखवटे ,मखर,मंडप व ईतर साहित्य घेण्यासाठी महिलांनी सिडको व हडकोतील मुख्यबाजार पेठेतील दुकानात खेळणे व लक्ष्मी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे.

गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप, लाईट, डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले असून जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक, यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

गणगौरी आवाहन १० सप्टेंबर सायंकाळी तर ११ ला सायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ तारखेला दर्शन व रात्री उशिरापर्यंत विसर्जन होणार असून गणपती बाप्पा स्थापना नंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या गणगौरी सणाच्या निमित्ताने महिलांनी मखर, मंडप, गणगौरी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे. मंडपात सजावटीसाठी खेळणी साहित्य हे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मध्ये आले असून विविध आकाराचे फुले, आरस, यासह सजावटीसाठी साहित्य दुकानदारी मोठ्या प्रमाणात सजावट करुन लावल्याने बाजारपेठेत रोषणाई आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments