नांदेड| नावामनपा पतसंस्थेची ऊत्कृष्ट वाटचाल चालू असून सभासदांना विविध योजना अंतर्गत लाखो रुपये लक्ष कर्ज उपलब्ध करून दिले असल्याचे सांगून संचालक मंडळाने सभासदासाठी केलेले कार्य उलेखनीय असल्याचे मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी आयोजित सर्व साधारण सभेत सांगितले.

८ सप्टेंबर रोजी मनपा कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु,सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, गुलाम संदेश,मिर्झा बेग, डॉ.रईसौध्दीन, संभाजी कास्टेवाड, रमेश चवरे, रावण सोनसळे, लेखाधिकारी चन्नावार,सदाशिव पंतगे, कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, विधुत अभियंता सतिश ढवळे,दिलीप आरसुडे, ऊपअभियंता दंडे,ऊपअभियंता प्रकाश कांबळे,सुरेश कोटगिरे,यांच्या सह संचालक मंडळ व मनपाचे विविध विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीती होती.

प्रारंभी थोर पुरूषांना अभिवादन करून संविधान ऊध्देशिका वाचन करण्यात आले व शहीद जवान व संस्थेच्या दिवगंत सभासद यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, मनपा प्राथमिक शाळा आंबेडकर नगर क्रं १० यांच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा यावर आधारित नाटीका सादरी करण करण्यात आले तर नांदेड शहर हरित करण्याचा संकल्प केलेल्या वृक्षमित्र संतोष मुगटकर यांच्या शालश्री फळ देऊन सत्कार केला. मनपा प्राथमिक शाळेला प्रार्थना व इतर कार्यक्रमासाठी माईक सेट संस्थेच्या वतीने देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई घुले यांच्या सत्कार करण्यात आला.

सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग यांनी संस्था अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी संस्था आवारात वृक्ष लागवड केली म्हणून वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते व मनपा शाळा शिक्षिका आशा घुले यांच्या सत्कार करण्यात आला, यावेळी सेवानिवृत्त सभासद सपत्नीक व सेवानिवृत्त संचालक अब्दुल हबीब अब्दुल रशीद,कांबळे यांच्या व गुणवत पाल्यांच्या सन्मान चिन्ह,सन्मान पत्र, देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ऊपायुक्त आजिंतपाल संधु यांनी ही पतसंस्थेची ऊत्कृष्ट वाटचाल करीत असल्याचे सांगितले, तर संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सभासदांचा विश्वासातून केलेल्या कामामुळे पतसंस्थेला यश मिळाले असून हि संस्था स्वलंबी पतसंस्था म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला. सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी सभासद बाधंवासाठी सानुग्रह अनुदान ६ लाख व उच्च शिक्षणासाठी,सभासद मुलीसाठी, बाळतपंणासाठी, शिक्षणासाठी या सह आरोग्य साठी विविध योजना अंतर्गत कर्जा साठी घोषणा केली या वेळी सभासद बांधवानी टाळयाचा कडकडाट मध्ये या घोषणेचे स्वागत केले, कार्यक्रम सुत्रसंचालन प्रकाश कांबळे,आशाताई घुले यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी संचालक तौसीफ अली,गणेश नागरगोजे,शिवाजी बाबरे,साहेबराव जौधंळे,नंदु लंगडे, यांच्या सह कर्मचारी आनंद सरोदे, सुनिता गोरे, कविता खूपसे, संदीप घोगरे, यांनी परिश्रम घेतले.