Mahanagar Palika Sanstha ; नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका पतसंस्थेची वाटचाल उत्कृष्ट – NNL
नांदेड| नावामनपा पतसंस्थेची ऊत्कृष्ट वाटचाल चालू असून सभासदांना विविध योजना अंतर्गत लाखो रुपये लक्ष कर्ज उपलब्ध करून दिले असल्याचे सांगून संचालक मंडळाने सभासदासाठी केलेले कार्य उलेखनीय असल्याचे मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी आयोजित सर्व साधारण सभेत सांगितले.
८ सप्टेंबर रोजी मनपा कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु,सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, गुलाम संदेश,मिर्झा बेग, डॉ.रईसौध्दीन, संभाजी कास्टेवाड, रमेश चवरे, रावण सोनसळे, लेखाधिकारी चन्नावार,सदाशिव पंतगे, कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, विधुत अभियंता सतिश ढवळे,दिलीप आरसुडे, ऊपअभियंता दंडे,ऊपअभियंता प्रकाश कांबळे,सुरेश कोटगिरे,यांच्या सह संचालक मंडळ व मनपाचे विविध विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीती होती.
प्रारंभी थोर पुरूषांना अभिवादन क...
