On the occasion of Gangauri festival, Mahalakshmi ; गणगौरी सणाच्या निमित्ताने अनेक कुंटुबाचा निवासस्थानी महालक्ष्मी स्थापना,तिन दिवशीय पुजेची सांगता -NNL
नवीन नांदेड l गणगौरी लक्ष्मी सणाच्या निमित्ताने परिसरातील अनेक निवासस्थानी व ग्रामीण भागात महालक्ष्मी स्थापना विधीवत पुजन करून स्थापना केली असून मुखवटे , मखर,मंडप व सजावट केली असून मोठ्या संख्येने महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.
गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप,लाईट,डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले होते तर जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक,यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले तर महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने सिडको परिसरातील विविध भागात पूजेचे साहित्य विक्री साठी आले होते.
गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आवाहन १० सप्टेंबर रोजी सायंकाळी झाले तर११ लासायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ सप...

