नांदेडलाइफस्टाइल

Potholes : जुना गंज – मनसुरखान हवेली चौरस्त्यावर खड्डेच खड्डे

नांदेड| जुन्या नांदेड भागातील जुनागंज – मनसुरखान हवेली चौरस्त्यावर खड्डेच खडे पडलेले आहेत. यामुळे वाहन चालकासह नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेश चतुर्थी पुर्वी खड्डे बुजवण्याची मागणी साईनाथ यादव यांनी मनपाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

जुनागंज- मनसुरखान हवेली चौरस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत असुन वाहन चालक जखमी होत आहेत. खड्यामुळे नागरीकही पडत असुन जखमी होत आहेत. याची दखल घेवुन या भागातील खड्डे बजुवण्यात यावे अशी मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे. या भागात सिमेंट रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असुन सिमेंट रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी होत आहे.

तसेच ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले नाही. ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण करुनच सिमेंट रस्त्याचे काम करावे अशी नागरीकांची मागणी आहे. या भागातील नाल्यांची सफाई गेल्या अनेक महिन्यापासुन करण्यात आली नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. त्याचा परिणाम नाल्यातील घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असुन खड्यात जमा होत आहे. त्यातुन दुर्गंधी सुटत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button